PM Internship Scheme 2025: या योजनेतून तरुणांना मिळणार दरमहा 5000 रुपये, अंतिम तारीख 31 मार्च

3 Min Read
PM Internship Scheme Maharashtra Apply Online

PM Internship Scheme 2025 Registration : केंद्र सरकारच्या पीएम इंटर्नशिप योजने (PM Internship Scheme) अंतर्गत देशभरातील एक कोटी तरुणांना दरमहा 5000 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश तरुणांना व्यावसायिक कौशल्य मिळवण्याची संधी देणे हा आहे. ही योजना पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून, पहिल्या दोन वर्षांत 30 लाख आणि नंतरच्या तीन वर्षांत 70 लाख युवकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 ही आहे.

PM Internship योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभांविषयी संपूर्ण माहिती

पीएम इंटर्नशिप योजनेत (PM Internship Yojana) सहभागी होणाऱ्या तरुणांना दरमहा 5000 रुपये भत्ता दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, या रकमेतील 4500 रुपये सरकारकडून दिले जातील, तर उर्वरित 500 रुपये कंपन्यांकडून त्यांच्या CSR (Corporate Social Responsibility) फंडातून दिले जातील. यासोबतच या योजनेचा लाभ घेणाऱ्या तरुणांना 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकरकमी 6000 रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या कंपन्या त्यांचे CSR उपक्रम म्हणून या योजनेत 10% योगदान देतील. त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळेल.

कोण करू शकतो अर्ज?

या योजनेसाठी 21 ते 24 वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात, मात्र त्यांच्याकडे किमान 10वी उत्तीर्ण असल्याच प्रमाणपत्र असण आवश्यक आहे.

कोण अर्ज करू शकत नाही?

ज्या तरुणांच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत कार्यरत आहे, त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये.

ज्या अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनाही या योजनेसाठी अपात्र मानले जाईल.

ज्या उमेदवारांना फुल-टाइम नोकरी आहे, ते देखील या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी (PM Internship Scheme) अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवारांनी सरकारच्या अधिकृत पोर्टल किंवा अ‍ॅपवर जाऊन नोंदणी करावी. अर्ज करताना आपल्या शैक्षणिक पात्रतेसह कौशल्य आणि आवडीविषयी माहिती भरावी लागेल. त्यानंतर, पात्रतेच्या आधारे इंटर्नशिपसाठी निवड केली जाईल.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतील. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, पत्ता पुरावा, शैक्षणिक कागदपत्रे यांचा समावेश असेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि अधिकृत वेबसाइट

PM Internship Scheme 2025 Registration Last Date : पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत पोर्टल किंवा अ‍ॅपवर जाऊन अर्ज करावा, अन्यथा ही संधी हातची जाऊ शकते.

👉 https://pminternship.mca.gov.in/login/

पीएम इंटर्नशिप योजनेमुळे (PM Internship Scheme) देशातील युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. भविष्यात नोकरीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ही योजना एक मोठी संधी आहे त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून आपले करिअर घडवण्याची संधी साधावी.

🔴 हेही वाचा 👉 तुम्ही पात्र आहात का? या सोप्या पद्धतीने तपासा.

Share This Article