PM Kisan APK Fraud Warning For Farmers : शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना! (PM Kisan Samman Nidhi Yojana) पिएम किसान योजनेअंतर्गत काही फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार शेतकऱ्यांना (PM Kisan list. APK) किंवा (PM Kisan APK) नावाच्या फेक फाइल्स आणि लिंक्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त करत आहेत. या लिंक्स उघडल्यावर शेतकऱ्यांचे बँक खाते रिकामे होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही अनधिकृत APK फाईल डाउनलोड करू नये किंवा लिंक वर क्लिक करू नये, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
फसवणुकीचे प्रकार:
✅ PM Kisan APK लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक होतो.
✅ बँक खाते आणि आधारशी संबंधित संवेदनशील माहिती चोरीला जाते.
✅ खात्यातील पैसे अनधिकृतरीत्या काढले जातात.
शेतकऱ्यांनी काय करावे?
✅ फक्त अधिकृत वेबसाइटवर (https://pmkisan.gov.in) आणि अधिकृत ॲपवर विश्वास ठेवा.
✅ कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
✅ PM Kisan संबंधित अनोळखी नंबरवरून आलेला कॉल किंवा मेसेज कडे दुर्लक्ष करा.
✅ कोणालाही तुमचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक किंवा OTP सांगू नका.
✅ फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर गुन्हे तक्रार संकेतस्थळावर (https://cybercrime.gov.in) तक्रार करा.
सरकारचे आवाहन:
शेतकऱ्यांनी स्वतःची माहिती आणि आर्थिक सुरक्षा जपण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाइट आणि ॲपचाच वापर करावा. कोणत्याही अनोळखी लिंक, मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये. शासनाने स्पष्ट केले आहे की PM Kisan योजनेसाठी कोणत्याही तृतीय-पक्षीय ॲप्स किंवा APK फाइल्स अधिकृत नाहीत.
🔴 हेही वाचा 👉 पीएम किसानचे पैसे मिळणे थांबले? जाणून घ्या संभाव्य कारणे.
तुमची सावधगिरी = तुमची सुरक्षा!
या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा आणि सुरक्षित रहा. फसवणुक टाळण्यासाठी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका आणि शासकीय माहिती फक्त अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच घ्या.
🔴 हेही वाचा 👉 CM Dashboard Maharashtra: ‘सीएम डॅश बोर्ड’ शासनाच्या सर्व योजनांची आणि सेवांची माहिती एका क्लिकवर!.