PM Kisan Mandhan Yojana Apply Online Benefits : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत असते. त्यापैकी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) ही शेतकऱ्यांसाठीची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाते. शेतकरी वृद्धापकाळात आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावे, हा या योजनेचा उद्देश आहे.
PM Kisan Mandhan ही योजना पेन्शन आधारित आहे आणि त्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना वयानुसार दरमहा 55 ते 200 रुपये भरावे लागतात. विशेष म्हणजे, सरकारदेखील त्याच रकमेत योगदान देते.
योजनेचे महत्त्व आणि फायदे
शेतकऱ्यांना वृद्धावस्थेत आर्थिक आधार मिळावा, यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळेल. जर लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला दरमहा 1,500 रुपये मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती शेतकरी असावा आणि त्याच्या नावावर जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत शेती असावी. अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे. तसेच, लाभार्थी इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा.
नोंदणी प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे आणि ती CSC (Common Service Center) किंवा संबंधित राज्य नोडल ऑफिसर यांच्या माध्यमातून करता येते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा किंवा जमीन मालकीचा पुरावा
- बँक खाते तपशील
- वयोमर्यादेनुसार 55 ते 200 रुपये प्रीमियम
(PM Kisan Mandhan Yojana) या योजनेने शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षित भविष्याचा मार्ग उघडला आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या.
🔴 हेही वाचा 👉 Tractor Anudan Yojana Maharashtra: ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 3.15 लाख रुपयांपर्यंत अनुदान, असा करा अर्ज.