PM Kisan Yojana 20th Installment Family Eligibility Rules : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, जे 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेच 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, शेतकरी आता 20व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कुटुंबातील सर्वांना मिळेल का लाभ?
पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार, एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. म्हणजेच, जर पतीने या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या अटींनुसार, लाभार्थीच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. जर एका कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने अर्ज केला, तर त्याचा अर्ज रद्द केला जाईल.
20वा हप्ता कधी जमा होणार?
दर 4 महिन्यांनी पिएम किसान योजनेचा हप्ता दिला जातो. 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यात आला असून, 20वा हप्ता जून महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
🔴 हेही वाचा 👉 शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन, असा करा अर्ज.
योजनेचा लाभ कसा मिळतो
थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे सरकार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवते. त्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांनी सर्व माहिती अचूक भरावी आणि आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करावा, जेणेकरून पैसे जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 विधवा महिलांसाठी विशेष योजना, सरकारकडून दरमहा आर्थिक सहाय्य.