PM Kisan Yojana Mobile Number Update Process : पिएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही (PM Kisan Samman Nidhi Yojana) पिएम किसान योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर अपडेट करणे अनिवार्य आहे.
सरकारच्या विविध योजनांमध्ये आधार, ई-केवायसी आणि मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) देखील हा नियम लागू आहे. जर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक अद्याप अपडेट केलेला नसेल किंवा नवीन नंबर घेतला असेल, तर त्वरित अपडेट करा अन्यथा तुमचा पिएम किसान योजनेचा 20वा हफ्ता (PM Kisan Yojana 20th Installment) अडकू शकते.
PM किसान योजनेसाठी मोबाईल नंबर कसा अपडेट कराल?
स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:
✅ स्टेप 1:
- अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- मुख्य पृष्ठावर ‘अपडेट मोबाइल नंबर’ पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
✅ स्टेप 2:
- तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म दिसेल.
- येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर यापैकी एक भरावा लागेल.
- तुम्ही आधार नंबर निवडल्यास, तो योग्य प्रकारे भरा.
✅ स्टेप 3:
- स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका.
- त्यानंतर ‘सर्च’ बटणावर क्लिक करा.
- पुढे ‘एडिट’ पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून नवीन मोबाइल नंबर टाका आणि अपडेट करा.
🔴 हेही वाचा 👉 रेशन कार्डधारकांने वेळीच व्हा सावध! अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान.
मोबाईल नंबर अपडेट करण्याचे फायदे:
✔ योजना अपडेट्स: PM किसान योजनेतील कोणत्याही बदलांची माहिती तुमच्या मोबाइलवर मिळेल.
✔ ई-केवायसीसाठी गरजेचे: ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे.
✔ हप्त्याची माहिती: तुमच्या खात्यात हप्ता जमा झाल्याचा संदेश थेट मोबाइलवर मिळेल.
- मोबाईल नंबर अपडेट करताना फक्त अधिकृत वेबसाइटचाच वापर करा.
- कोणत्याही फेक लिंकवर क्लिक करू नका किंवा तुमची व्यक्तिगत माहिती शेअर करू नका.
- जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटत असेल, तर जवळच्या CSC केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता.
PM किसान योजनेचा 20वा हफ्ता (PM Kisan 20th Installment) जमा होण्यासाठी मोबाईल क्रमांक अपडेट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही अद्याप हे काम केले नसेल, तर त्वरित pmkisan.gov.in वर जाऊन अपडेट करा.
🔴 हेही वाचा 👉 आता घरकुलासाठी स्वतः अर्ज केल्यास मिळणार निश्चित घरकुल मंजुरी.