PM Kisan Yojana Payment Stopped Reasons And Solutions : पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत थांबली आहे. यामागे विविध कारणे असू शकतात. काही शेतकरी अपात्र ठरले असून काहींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
कोणते शेतकरी अपात्र ठरू शकतात?
केंद्र सरकारने काही निकष ठरवले आहेत, ज्यामुळे खालील प्रकारच्या शेतकऱ्यांना (PM Kisan Yojana) पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते –
✅ महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास
✅ संविधानिक पदावर असताना योजनेचा लाभ घेतल्यास
✅ दुबार नोंदणी केल्यास
✅ निमशासकीय कर्मचारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असल्यास
✅ भूमिहीन झाल्यास (जमीन विक्रीमुळे)
✅ पूर्वीच्या संविधानिक पदावरील व्यक्ती असल्यास
✅ घरातील एका सदस्याला आधीच लाभ मिळत असल्यास
✅ संस्था किंवा ट्रस्टच्या मालकीची जमीन असल्यास
✅ 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केली असल्यास
✅ जमिनीच्या मालकीसंबंधी वाद असतील तर
✅ शेतीव्यतिरिक्त इतर कारणांसाठी जमीन वापरत असल्यास
✅ अनिवासी भारतीय (NRI) असल्यास
✅ नोंदणीकृत व्यावसायिक किंवा करदाता असल्यास
✅ सेवानिवृत्त लाभधारक असल्यास
✅ सज्ञान नसल्यास
✅ ओळख पटत नसल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास
शेतकऱ्यांनी काय करावे?
PM Kisan योजनेचा लाभ बंद झाला असेल तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ग्रामपातळीवरील कृषी सहाय्यक किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज फेरतपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जर कागदपत्र योग्य असतील तर त्यांना योजनेचा लाभ पुन्हा मिळू शकतो.
🔴 हेही वाचा 👉 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना; फार्मर आयडी काढा, अन्यथा गमवाल शासकीय अनुदानाचा लाभ.
PM Kisan योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
✔ आधार कार्ड (Aadhaar Card)
✔ सातबारा उतारा (Land Ownership Proof)
✔ बँक खाते तपशील (Bank Account Details)
✔ शेतकरी नोंदणी क्रमांक (Farmer Registration Number)
शेतकऱ्यांना मिळू शकतो योजनेचा लाभ
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, काही शेतकऱ्यांची पुन्हा पडताळणी केली जात आहे. आवश्यक कागदपत्रे योग्य ठरल्यास त्यांना (PM Kisan Yojana) पिएम किसान योजनेचा लाभ पुन्हा मिळू शकतो. मात्र, जे सरकारच्या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांनी अर्ज करू नये.
शेतकऱ्यांनी अडचण असल्यास स्थानिक कृषी सहाय्यक किंवा तलाठ्यांशी त्वरित संपर्क साधावा!
🔴 हेही वाचा 👉 तार कुंपण योजना आहे शेतीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती.