PM Vishwakarma Yojana: अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ अटी, अन्यथा अर्ज होईल रद्द!

2 Min Read
PM Vishwakarma Yojana Eligibility Apply Benefits

PM Vishwakarma Yojana Eligibility Apply Benefits : केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना (PM Vishwakarma Yojana) सुरू केली असून, या योजनेअंतर्गत पारंपरिक कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट अटी आणि पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो.

PM Vishwakarma Yojana 2025 साठी अर्ज कसा करावा?

✅ ऑनलाइन अर्ज: अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in वर जाऊन लॉगिन करून अर्ज करता येईल.  

✅ ऑफलाइन अर्ज: जवळच्या CSC केंद्रात (Common Service Center) जाऊन नोंदणी करता येईल.  

कोण अर्ज करू शकतो? (PM Vishwakarma Yojana Eligibility Criteria)

ही योजना फक्त 18 पारंपरिक व्यवसायांशी संबंधित व्यावसायिकांसाठी आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. खालील व्यवसायातील लोक या योजनेसाठी पात्र ठरतील –

🔹 न्हावीकाम करणारे (Barber)

🔹 बाहुली आणि खेळणी निर्माता (Toy Maker)  

🔹 अस्त्रकार आणि मूर्तिकार (Weapon & Idol Maker)

🔹 राजमिस्त्री (Mason) 

🔹 नाव निर्माता (Boat Maker)

🔹 लोहार (Blacksmith)

🔹 सोनार (Goldsmith)

🔹 मालाकार (Garland Maker) 

🔹 फिशिंग नेट, टोपली, चटई, झाडू तयार करणारे कारागीर  

🔹 दगड कोरणारे (Stone Carver)

🔹 धोबी (Washerman)

🔹 कुलूप तयार करणारे (Lock Maker)

🔹 *हातोडा व टूलकिट उत्पादक

🔹 टेलर (Tailor)  

🔴 हेही वाचा 👉 CM Dashboard Maharashtra: ‘सीएम डॅश बोर्ड’ शासनाच्या सर्व योजनांची आणि सेवांची माहिती एका क्लिकवर!.

PM Vishwakarma Yojana 2025 चे मुख्य फायदे:

✅ ₹15,000 टूलकिटसाठी अनुदान

✅ प्रशिक्षण कालावधीत दररोज ₹500 स्टायपेंड

✅ बँक गॅरंटीशिवाय ₹1 लाख कर्ज, त्यानंतर ₹2 लाख पर्यंत कर्ज

✅ सवलतीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध

🔴 हेही वाचा 👉 15 एप्रिलपासून नवीन मोहिम सुरू! शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा.

Share This Article