PM Vishwakarma Yojana: परंपरागत व्यवसायीकांसाठी सरकारकडून 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध

2 Min Read
PM Vishwakarma Yojana Loan Benefits Apply

PM Vishwakarma Yojana Loan Benefits Apply : पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश परंपरागत उद्योग आणि कौशल्यधारकांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण करणे हा आहे.

विश्वकर्मा योजना 18 पारंपरिक व्यवसायांशी संबंधित व्यवसायीकांसाठी लागू आहे. यामध्ये नाव बनवणारे, माळी, कुलूप बनवणारे, राजमिस्त्री, सोनार, न्हावी, मूर्तिकार, मासेमारी जाळे बनवणारे, खेळणी तयार करणारे, टोकरी व चटई बनवणारे, दगड कोरणारे, धोबी, टेलर, हातोडा व टूलकिट बनवणारे, लोहार, दगड कोरणारे आणि अस्त्रकार अशा व्यावसायिकांचा समावेश आहे.

पिएम विश्वकर्मा योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचा लाभ घेता येतो. सरकारतर्फे व्यवसाय वाढवण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. प्रथम टप्प्यात 1 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज वेळेवर परतफेड केल्यास लाभार्थीला पुढील टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त कर्ज घेण्याची संधी मिळते. हे कर्ज अत्यल्प व्याजदराने दिले जाते, ज्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी मोठी मदत मिळते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यवसायीकांना नोंदणी करावी लागते. अर्जदाराने आधार कार्ड, व्यवसाय प्रमाणपत्र, बँक खाते तपशील आणि अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सरकारच्या या योजनेमुळे कौशल्याधारित परंपरागत व्यवसायांना चालना मिळत आहे.

🔴 हेही वाचा 👉 शेतकरी कर्जमाफीबाबत आरबीआयचे नवीन परिपत्रक, शेतकऱ्यांसाठी काय बदलणार?.

Share This Article