PMEGP Loan Scheme: छोट्या व्यावसायिकांना सरकारकडून 50 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत, ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी अनुदाने

2 Min Read
PMEGP Loan Scheme Small Business Financial Aid (फोटो : Adobe Stock)

PMEGP Loan Scheme Small Business Financial Aid : देशात लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत नवीन व्यावसायिकांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. विशेष म्हणजे, 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतीही हमी आवश्यक नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) योजना विशेषतः बेरोजगार युवक आणि लघु व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे, जेणेकरून त्यांना शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही.

कर्ज घेण्यासाठी किती रक्कम स्वतःकडे असावी लागेल?

PMEGP योजनेअंतर्गत, व्यावसायिकांना कर्जाच्या एकूण रकमेच्या फक्त 5% निधी स्वतः उभारावा लागेल, तर उर्वरित रक्कम सरकारकडून कर्जाच्या स्वरूपात दिली जाईल.  

  • मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी – 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज
  • सर्व्हिस सेक्टरसाठी – 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज

ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी अनुदाने

  • ग्रामीण भागातील अर्जदारांना 35% पर्यंत अनुदान मिळू शकते.  
  • शहरी भागातील अर्जदारांना 25% पर्यंत अनुदान दिले जाते.  

या योजनेत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय दिले जाते, 

अर्ज कसा करावा?

PMEGP योजनेविषयी अधिक माहितीसाठी https://sbi.co.in/hi/web/business/sme/sme-government-schemes/pmegp या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

🔴 हेही वाचा 👉 Aadhaar Card Misuse Check: तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय का? कस तपासाव आणि काय कराव?.

Share This Article