Ration Card Aadhaar Link Deadline Extended March 31 : राज्य सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी आधार क्रमांक जोडण्याच्या (e-KYC) प्रक्रियेसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने ही घोषणा केली असून, विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे.
2011 पासून आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र त्यावेळी घेतलेले छायाचित्र आता जुनं झाल्याने केवायसी प्रक्रियेत अनेकांना अडथळे येत आहेत. त्यामुळे आधार केंद्रांवर मोठ्या रांगा लागत आहेत त्यासाठी नागरिकांना तासनतास थांबावे लागत आहे.
नागरिकांना सरकारने “मेरा ई-केवायसी” हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. मात्र, अनेक शिधापत्रिका धारकांच्या सध्याच्या छायाचित्रात व आधार कार्डवरील छायाचित्रात तफावत असल्याने आधार लिंक करण्याची प्रक्रिया रखडत आहे. तसेच, आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी लागणारा कालावधीही मोठा असल्याने नागरिक अडचणीत आले आहेत.
ग्रामीण भागातील अनेक शिधापत्रिका धारक अशिक्षित असल्याने ई-केवायसी प्रक्रियेत मोठा गोंधळ होत आहे. याशिवाय, रेशन दुकानदारांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचीही तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया अन्न व नागरी पुरवठा विभागाने थेट रेशन वितरकांकडूनच करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शासनाने मुदतवाढ दिली असली तरी नागरिकांना या प्रक्रियेत सुलभता मिळावी यासाठी सरकारने अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.
🔴 हेही वाचा 👉 परंपरागत व्यवसायीकांसाठी सरकारकडून 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध.