Ration Card e-KYC Maharashtra Fraud Alert : रेशन कार्डधारकांने वेळीच व्हा सावध! अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान

3 Min Read
Ration Card E Kyc Maharashtra Fraud Alert Safe Process

Ration Card e-KYC Maharashtra Fraud Alert : भारतातील अंत्योदय अन्न योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत 80 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना दरमहा मोफत रेशन पुरवले जाते. ही सुविधा कोरोना काळात सुरू करण्यात आली होती आणि सध्या देखील सुरूच आहे.

सरकारने रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card e-KYC) अनिवार्य केली आहे, मात्र अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेली नाही. याच गोष्टीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा फसवणुकीपासून स्वतःला कस वाचवायच ते जाणून घेऊयात…

रेशन कार्ड e-KYC फसवणूक कशी केली जाते?

  • फसवणूक करणारे लाभार्थ्यांना कॉल करून भीती घालतात – “तुम्ही e-KYC केली नाही तर रेशन कार्ड बंद होईल!”  
  • हे सायबर गुन्हेगार SMS किंवा WhatsApp द्वारे लिंक पाठवतात आणि त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगतात.  
  • काही ठग OTP मागतात आणि तुमचा OTP मिळाल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात.
  • अनेक लोक रेशन कार्ड बंद होण्याच्या भीतीला घाबरून त्या लिंकवर क्लिक करतात आणि आपली व्यक्तिगत माहिती शेयर करतात.  

फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवाल?

✅ अधिकृत माहितीची खात्री करा: e-KYC संबंधित कोणतीही माहिती फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा स्थानिक रेशन दुकानात मिळेल.  

✅ अनोळखी कॉल्स किंवा SMS वर विश्वास ठेवू नका: सरकार किंवा कोणतेही अधिकृत अधिकारी कधीही फोनवरून OTP, बँक डिटेल्स किंवा आधार क्रमांक विचारत नाहीत.  

✅ कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका: तुम्हाला जर SMS किंवा WhatsApp वर e-KYC करण्यासाठी लिंक मिळाली तर ती उघडू नका.

✅ फक्त अधिकृत केंद्रांमध्येच e-KYC करा: रेशन कार्ड e-KYC करण्यासाठी तुमच्या जवळच्या अधिकृत रेशन डीलरकडे जा.  

रेशन कार्ड e-KYC करण्याची योग्य पद्धत

1️⃣ नजीकच्या रेशन दुकानात जा. 

2️⃣ POS मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी (फिंगरप्रिंट किंवा आधार प्रमाणीकरण) करून घ्या.  

3️⃣ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा तपशील अपडेट करा.  

4️⃣ e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुष्टीकरण मिळवा. 

🔴 हेही वाचा 👉 आता घरकुलासाठी स्वतः अर्ज केल्यास मिळणार निश्चित घरकुल मंजुरी.

रेशन कार्ड e-KYC करण्यासाठी कोणत्याही तृतीय पक्षाच्या वेबसाइट्स, कॉल्स किंवा SMS वर विश्वास ठेवू नका.

रेशन कार्ड e-KYC ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे, पण ती फक्त अधिकृत केंद्रांमधूनच पूर्ण करा. अनोळखी कॉल्स, SMS किंवा वेबसाईटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका असे केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावध राहा आणि सुरक्षित आणि योग्य पद्धतीने e-KYC पूर्ण करा.

🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana 2100 Rs Date : लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधीपासून मिळणार?.

Share This Article