Ration Card e-KYC: ही आहे घरबसल्या ई-केवायसी करण्याची सर्वात सोपी पद्धत

2 Min Read
Ration Card E Kyc Online Offline Process

Ration Card E Kyc Online Offline Process : रेशन कार्ड हे देशातील करोडो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याद्वारे कमी दरात किंवा मोफत धान्य मिळते, तसेच ते ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) प्रत्येक रेशन कार्डधारकाने पाच वर्षांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मात्र, 2013 नंतर अनेक जणांनी ई-केवायसी केलेले नाही. त्यामुळे आता ते अपडेट करणे आवश्यक आहे.

घरबसल्या ऑनलाइन ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

डिजिटल युगात रेशन कार्डसाठी ई-केवायसी करणे अगदी सोपे झाले आहे. यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाइल आणि इंटरनेटच्या मदतीने घरी बसूनच ई-केवायसी करता येते.  

सर्वप्रथम, “Mera KYC” आणि “Aadhaar FaceRD” ही ऍप्स आपल्या मोबाइलवर डाउनलोड करावी लागतील. त्यानंतर ऍप उघडून लोकेशनची नोंदणी करावी. आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला संपूर्ण डेटा स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर फेस ई-केवायसी पर्याय निवडावा.

यानंतर कॅमेरा ऑन करून चेहऱ्याचा फोटो काढून सबमिट करावा. यानंतर काही वेळातच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.  

🔴 हेही वाचा 👉 रायगड जिल्ह्यातील 15 हजार महिलांना अपात्र ठरवल्याच्या वृत्तावर मंत्री अदिती तटकरेंच स्पष्टीकरण.

ई-केवायसी स्टेटस कसे तपासायचे?

जर कोणी आधीच ई-केवायसी केले असेल आणि त्याचा स्टेटस तपासायचा असेल, तर पुन्हा “Mera KYC” ऍप उघडावे. त्यानंतर लोकेशन, आधार क्रमांक आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे. स्टेटसमध्ये ‘Y’ दाखवले गेले तर ई-केवायसी पूर्ण झाले आहे.

ऑफलाइन ई-केवायसी करण्याची पद्धत

काही जणांना ऑनलाइन प्रक्रिया करणे शक्य नसेल, किंवा मोबाइल ऍपमध्ये अडचण येत असेल, तर ते जवळच्या रेशन दुकानात जाऊन ऑफलाइन ई-केवायसी करू शकतात. यासाठी त्यांना आधार कार्ड आणि रेशनकार्ड सोबत घेऊन जावे लागेल.

रेशन दुकानात POS मशीनच्या मदतीने अंगठ्याचा ठसा किंवा बोटांचे निशाण घेतले जातील. सत्यापन पूर्ण झाल्यानंतर त्यांचे ई-केवायसी अपडेट होईल.

सरकारने रेशन कार्डधारकांसाठी ही प्रक्रिया सुलभ केली आहे. वेळेवर ई-केवायसी करून आपले रेशन कार्ड वैध असल्याची खात्री करणे गरजेचे आहे.

🔴 हेही वाचा 👉 20व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत? या शेतकऱ्यांना बसू शकतो फटका.

Share This Article