Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana: दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र सरकारची आर्थिक मदत योजना
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana 2025 : महाराष्ट्र राज्यातील दुर्बल, विधवा, दिव्यांग आणि अन्य गरजू महिलांसाठी सामाजिक न्याय विभाग (Maharashtra Social Justice and Special Assistance Department) मार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) राबवली जाते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे अनुदान मिळते.
Contents
Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana: दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र सरकारची आर्थिक मदत योजनायोजनेचा उद्देश आणि पात्रतायोजनेचे लाभार्थी (Beneficiaries)संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Required Documents)संजय गांधी निराधार योजना अनुदान आणि अर्ज प्रक्रियाऑनलाईन अर्ज करण्यासाठी
योजनेचा उद्देश आणि पात्रता
राज्यातील गरीब, अनाथ, अत्याचारित महिला आणि दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य मिळावे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
योजनेचे लाभार्थी (Beneficiaries)
- विधवा महिला
- दिव्यांग व्यक्ती
- दुर्धर आजारग्रस्त रुग्ण
- अनाथ बालके
- परित्यक्ता व अत्याचारित महिला
- देवदासी आणि वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
- तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखांच्या पत्नी
- 35 वर्षांवरील अविवाहित निराधार महिला
🔴 हेही वाचा 👉 आता घरकुलासाठी स्वतः अर्ज केल्यास मिळणार निश्चित घरकुल मंजुरी.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana Required Documents)
- अर्ज नमुना (विहीत स्वरूपात)
- वयाचा दाखला (किमान 18 ते 65 वर्षे)
- महाराष्ट्र राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र (किमान 15 वर्षांचा दाखला)
- विधवा महिला असल्यास पतीचा मृत्यू दाखला
- दिव्यांग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकाचा 40% पेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र
- अनाथ बालकांसाठी अनाथ प्रमाणपत्र
- दुर्धर आजारग्रस्त असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला (दिव्यांग व्यक्तींसाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ₹50,000/-)
- आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स आणि अर्जदाराचा फोटो
संजय गांधी निराधार योजना अनुदान आणि अर्ज प्रक्रिया
- अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा ₹1500 अनुदान थेट बँक खात्यात जमा होईल.
- अर्ज करण्यासाठी तालुका तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला भेट द्यावी.
- इच्छुक लाभार्थी अर्ज ऑनलाईन देखील करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
➡ https://aaplesarkar.mahaonline.gov.in
🔴 हेही वाचा 👉 वेळेत पूर्ण करा हे एक काम, नाहीतर मिळणार नाही 20वा हप्ता.