Shravan Bal Yojana Maharashtra 2025 : राज्यातील निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Shravan Bal Yojana) राबवली जाते.
श्रावण बाळ योजनेचा उद्देश
श्रावण बाळ ही योजना राज्यातील 65 वर्षांवरील गरीब आणि वंचित ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹1500 निवृत्तीवेतन प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळवून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे, त्यांचे जीवनमान सुधारणे आणि जेष्ठ नागरिकांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
महत्त्वाच्या बाबी
- योजना नाव: श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
- विभाग: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
- लाभ: दरमहा 1500 रुपये
- लाभार्थी: 65 वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिक
Shravan Bal Yojana पात्रता (Eligibility Criteria)
- वय: किमान 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक
- राहिवास: किमान 15 वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
- वार्षिक उत्पन्न: ₹21,000 पेक्षा कमी असावे
- दारिद्र्यरेषेखालील आणि त्यावरील नागरिकही अर्ज करू शकतात
🔴 हेही वाचा 👉 लाखो लाडक्या बहिणींनी दुहेरी लाभ घेतल्याचा प्रकार उघड, कारवाई करण्याच्या तयारीत सरकार.
Shravan Bal Yojana आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- अर्जाचा विहीत नमुना
- वयाचा दाखला (जन्म प्रमाणपत्र / आधार कार्ड / पॅन कार्ड)
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- अर्जदाराचा फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र
अर्ज प्रक्रिया (How to Apply?)
- ऑफलाइन अर्ज: तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सेतु केंद्रावर जाऊन अर्ज सादर करावा.
- ऑनलाइन अर्ज: राज्य सरकारच्या आपले सरकार पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी:
महत्त्वाचे मुद्दे
- निवृत्तीवेतनाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.
- अर्जदारांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा ₹1500 निवृत्तीवेतन मिळेल.
- अधिक माहितीसाठी तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा सेतु केंद्राशी संपर्क साधा.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Shravan Bal Yojana) ही महाराष्ट्रातील गरीब, निराधार आणि वंचित ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत असे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तात्काळ अर्ज करा.
🔴 हेही वाचा 👉 राज्यातील दुर्बल, विधवा महिलांसाठी सरकारची मदत योजना, दरमहा मिळणार ₹1500 अनुदान.