Small Savings Schemes Interest Rates April June 2025 : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीसाठी (1 एप्रिल 2025 ते 30 जून 2025) विविध लघु बचत योजनांचे व्याज दर जाहीर केले आहेत. सरकारने पाचव्या तिमाहीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि राष्ट्रीय बचत पत्र (NSC) यांसारख्या योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
वित्त मंत्रालयाच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, 2024-25 च्या चौथ्या तिमाहीसाठी लागू असलेले व्याजदर नवीन तिमाहीसाठीही कायम ठेवण्यात आले आहेत. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर 8.2 टक्के, PPF साठी 7.1 टक्के आणि पोस्ट ऑफिस बचत खात्यासाठी 4 टक्के इतका असेल.
किसान विकास पत्रावरील व्याजदर 7.5 टक्के असून, या योजनेतील गुंतवणुकीचा परिपक्वता कालावधी 115 महिन्यांचा आहे. राष्ट्रीय बचत पत्रावरील व्याजदर 7.7 टक्के, तर मासिक उत्पन्न योजनेसाठी 7.4 टक्के इतका व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.
पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या लघु बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकार दर तिमाहीत या दरांचा आढावा घेते आणि गरजेनुसार सुधारणा करते.
🔴 हेही वाचा 👉 कोणत्या लोकांचे बनू शकत नाही विवाह प्रमाणपत्र? जाणून घ्या महत्त्वाचे नियम.