Sukanya Samriddhi Vs Mahila Samman Saving Best Scheme For Women : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सुकन्या समृद्धि योजना (SSY) आणि महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट (MSSC) या दोन महत्त्वाच्या योजना आहेत. या दोन्ही योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जातात आणि दोन्हीही आकर्षक व्याजदर देतात. पण कोणती योजना जास्त फायदेशीर आहे? त्याबद्दल जाऊन घेऊयात…
सुकन्या समृद्धि योजना (SSY)
- सुरुवात: जानेवारी 2015
- कोणासाठी? 10 वर्षांखालील मुलींसाठी
- किती खाती उघडता येतील?
– एका मुलीच्या नावाने एक खाते
– एका कुटुंबात 2 खाती
– जुळ्या मुली असल्यास 3 खाती
गुंतवणूक व व्याजदर:
- किमान गुंतवणूक: ₹250
- कमाल गुंतवणूक: ₹1.5 लाख प्रति वर्ष
- सध्याचा व्याजदर: 8.2% वार्षिक
मुदत आणि पैसे कधी मिळतील?
- मॅच्युरिटी: 21 वर्षांनी
- 18 वर्षांनंतर 50% रक्कम काढता येते
करसवलत:
- आयकर कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंत करसवलत
- व्याज आणि अंतिम रक्कम करमुक्त
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट (MSSC)
- सुरुवात: एप्रिल 2023 (फक्त 2 वर्षांसाठी)
- वैधता: 31 मार्च 2025 पर्यंत
- कोणासाठी? महिला आणि नाबालिग मुलींसाठी पालक खाते उघडू शकतात
- सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध
गुंतवणूक व व्याजदर:
- किमान गुंतवणूक: ₹1,000
- कमाल गुंतवणूक: ₹2 लाख
- सध्याचा व्याजदर: 7.5% वार्षिक
मुदत आणि पैसे कधी मिळतील?
- मॅच्युरिटी: 2 वर्षांनंतर
- 1 वर्षानंतर 40% रक्कम काढता येते
- 6 महिन्यांनंतर अकाउंट बंद करता येते (2% व्याज कपात होईल)
करसवलत:
- यामध्ये करसवलतीची तरतूद नाही
कोणती योजना सर्वोत्तम?
घटक | सुकन्या समृद्धि योजना (SSY) | महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट (MSSC) |
---|---|---|
वैधता | कायमस्वरूपी | 31 मार्च 2025 पर्यंत |
व्याजदर | 8.2% वार्षिक | 7.5% वार्षिक |
मॅच्युरिटी कालावधी | 21 वर्ष | 2 वर्ष |
किमान गुंतवणूक | ₹250 | ₹1,000 |
कमाल गुंतवणूक | ₹1.5 लाख | ₹2 लाख |
करसवलत | 80C अंतर्गत करसवलत उपलब्ध | नाही |
मुदतीपूर्व पैसे काढण्याची संधी | 18 वर्षांनंतर 50% काढता येते | 1 वर्षानंतर 40% काढता येते |
खाते कोण उघडू शकते? | फक्त मुलींसाठी | महिला आणि मुलींसाठी |
🔴 हेही वाचा 👉 2100 रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंच मोठ विधान.
कोणती योजना निवडावी?
- दीर्घकालीन आणि करसवलत हवी असेल तर → सुकन्या समृद्धि योजना (SSY) सर्वोत्तम पर्याय आहे.
- अल्पकालीन आणि 2 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर → महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट (MSSC) योग्य आहे.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्र सरकारकडून मुलींसाठी आर्थिक मदत, पात्रता व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
Best Saving Scheme For Ladies In Post Office : जर तुम्हाला लाँग-टर्म सेव्हिंग आणि करसवलत हवी असेल, तर SSY सर्वोत्तम आहे. पण कमी कालावधीसाठी गुंतवणूक आणि जलद पैसे काढण्याची सोय हवी असेल, तर तुमच्यासाठी MSSC फायदेशीर ठरू शकते.