Incentive Scheme for UPI : UPI व्यवहारांवर सरकारचा नवा प्लॅन! लहान दुकानदारांसाठी इन्सेन्टिव्ह योजनेची घोषणा

1 Min Read
UPI Incentive Scheme For Small Merchants India 2025

Incentive Scheme To Promote BHIM UPI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन UPI प्रोत्साहन योजना मंजूर केली आहे. ₹2,000 पर्यंतच्या P2M (Person to Merchant) UPI व्यवहारांसाठी व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ दिला जाणार आहे. डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.  

योजनेची वैशिष्ट्ये:

  • एकूण अंदाजित खर्च: ₹१,५०० कोटी  
  • प्रोत्साहन रक्कम: प्रत्येक व्यवहारावर ०.१५% इन्सेन्टिव्ह  
  • लाभार्थी: लहान दुकानदार व व्यापारी, जे BHIM UPI स्वीकारतात

व्यापाऱ्यांना कसा फायदा होईल?

UPI Incentive Scheme For Small Merchants India 2025 : जर एखाद्या ग्राहकाने ₹१,००० चे UPI पेमेंट केले, तर त्या दुकानदाराला ₹१.५ प्रोत्साहन स्वरूपात मिळतील. डिजिटल व्यवहार अधिक सोपे करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.  

बँकांसाठीही प्रोत्साहन योजना

  • बँकांना त्यांच्या व्यवहारांवर इन्सेन्टिव्ह दिले जाणार.
  • ८०% प्रोत्साहन रक्कम त्वरित मिळेल, उर्वरित २०% केवळ तांत्रिक त्रुटी ०.७५% पेक्षा कमी असतील तर दिली जाईल.
  • सुरक्षित आणि जलद व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी बँकांना त्यांच्या प्रणालीमध्ये सुधारणा करावी लागेल.  

डिजिटल व्यवहारांसाठी केंद्र सरकारची मोठी पावले

यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार अधिक सुरक्षित, जलद आणि विनाशुल्क व्हावेत, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. डिजिटल इंडिया मिशनला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल.

🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य.

Share This Article