Vidhwa Pension Yojana Maharashtra 2025 Apply Online : विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी राज्य सरकारतर्फे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना (Indira Gandhi Widow Pension Scheme Maharashtra) राबवली जाते. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते, जेणेकरून त्यांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
ही योजना सामाजिक न्याय विभागाद्वारे राबवली जाते. विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देऊन स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या (Widow Pension Scheme Maharashtra) योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांचे जीवनमान उंचावण्यास मदत केली जाते.
योजनेसाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
पात्र लाभार्थी:
- दारिद्र्यरेषेखालील विधवा महिला.
- अर्जदारा महिलेचे वय 40 ते 70 वर्षे असावे.
- अर्जदार किमान 15 वर्षे महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
- विहीत नमुन्यातील अर्ज.
- वयाचा दाखला.
- पतीच्या मृत्यूचा दाखला आणि मोठ्या मुलाच्या वयाचा दाखला.
- आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र.
- बँक पासबुकची झेरॉक्स प्रत.
- रहिवासी दाखला.
- अर्जदाराचा पासपोर्ट साईझ फोटो.
अर्ज प्रक्रिया आणि मदत केंद्र
Widow Pension Scheme Maharashtra Apply Online: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका तहसील कार्यालयातील सेतु केंद्रात अर्ज सादर करावा लागेल. तसेच, इच्छुक महिलांना ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आपले सरकार पोर्टलवर (Aaple Sarkar Portal) लॉगिन करून ऑनलाईन अर्ज करता येतो.
अधिकृत अर्ज लिंक: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
ही योजना राज्यातील हजारो विधवा महिलांसाठी आर्थिक आधार बनली आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे विधवा महिलांना स्वतंत्र आणि आत्मनिर्भर जीवन जगण्याची संधी मिळत आहे.
🔴 हेही वाचा 👉 जागा खरेदीसाठी मिळणार 1 लाख रुपयांचे अनुदान.