Vihir Anudan Yojana Maharashtra 2025 Irrigation Well Subsidy Apply : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राज्य सरकारने सिंचन विहिरींसाठी अनुदान वाढवले आहे. यापूर्वी 4 लाख रुपये मिळत असलेल्या अनुदानात 1 लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून, शेतकऱ्यांना आता 5 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
सिंचन सोयीसाठी मोठा निर्णय
राज्यातील शेती अधिक ओलिताखाली आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मनरेगा योजनेच्या माध्यमातून विहीर खोदण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ज्या भागांमध्ये मनरेगा अंतर्गत कामे सुरू आहेत, तिथे ही योजना लागू करण्यात आली आहे.
अनुदान कसे मिळेल?
ग्रामपंचायतीकडे अर्ज दाखल केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते.
विहिरीचे काम पूर्ण होण्याच्या टप्प्यानुसार अनुदान थेट बँक खात्यात वर्ग केले जाते.
कोणते शेतकरी पात्र आहेत?
या गटातील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळेल:
✔ अनुसूचित जाती / जमाती, भटक्या व विमुक्त जातीतील शेतकरी
✔ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे)
✔ महिला प्रमुख असलेली कुटुंबे
✔ दिव्यांग कर्ता असलेली कुटुंबे
✔ जमीन सुधारणा लाभार्थी
✔ इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
✔ सीमांत (2.5 एकरपर्यंत जमीन) आणि अल्पभूधारक (5 एकरपर्यंत जमीन) शेतकरी
विहिरीसाठी पात्रतेचे निकष
अर्जदाराकडे किमान 1 एकर सलग शेती असावी.
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतर असावे.
दोन विहिरींमध्ये किमान 250 मीटर अंतर आवश्यक (मागासवर्गीय व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी हा नियम लागू नाही).
सातबाऱ्यावर आधीपासून विहिरीची नोंद नसावी.
अर्जदार जॉब कार्ड धारक असावा.
🔴 हेही वाचा 👉 Online Varas Nondani Maharashtra : वारसा नोंदणीच्या नियमांत बदल! नवीन प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Vihir Anudan Yojana Maharashtra 2025 अर्ज प्रक्रिया
✔ पात्र शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दाखल करावा.
✔ अधिक माहितीसाठी ग्रामसेवक किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
➡ विहीर अनुदान योजनेसाठी (Vihir Anudan Yojana Maharashtra) अर्ज करा आणि आपल्या शेतीसाठी सिंचनाची सोय करा!
🔴 हेही वाचा 👉 Jivant 7-12 Mohim Maharashtra: 1 एप्रिलपासून राज्यात ‘जिवंत 7/12 मोहिम’; नव्या नियमांमुळे कोणते महत्त्वाचे बदल होणार?.