Voter ID Aadhar Card Link: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक केल्याने काय बदल होणार?

2 Min Read
Voter ID Aadhar Card Link Update 2025

Voter ID Aadhar Card Link : भारतीय निवडणूक आयोगाकडे सध्या 66 कोटींहून अधिक मतदारांचे आधार तपशील उपलब्ध आहेत. या सर्व मतदारांनी आपली माहिती स्वेच्छेने आयोगाला दिली आहे. मात्र, अद्याप आधार आणि मतदार ओळखपत्राचे (Voter ID) डेटाबेस जोडलेले नाहीत. गृह मंत्रालय आणि निवडणूक आयोगाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मतदार ओळखपत्र (Voter ID) आणि आधार कार्ड लिंक करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

🔴 येथे वाचा 👉 Voter ID आधार कार्डशी लिंक नसल्यास रद्द? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

आधार-वोटर आयडी डेटाबेस लिंक होणार

Voter ID Link With Aadhar Card: गेल्या काही वर्षांपासून मतदार यादीत डुप्लिकेट नावे समाविष्ट होणे आणि अनधिकृतरित्या हटवण्याचा मुद्दा समोर येत आहे. या समस्येवर उपाय म्हणून आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे.  

  • गृह मंत्रालय, निवडणूक आयोग, कायदा मंत्रालय, IT मंत्रालय आणि आधार विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.  
  • 66 कोटी मतदारांचे आधार तपशील निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहेत, मात्र मतदार यादीत अद्याप त्यांचे लिंकिंग झालेले नाही.  
  • हा निर्णय लागू झाल्यानंतर मतदार यादीतील नावे अधिक स्पष्ट आणि अचूक ठेवणे शक्य होईल.  

आधार लिंकिंग स्वेच्छेने असेल

ही संपूर्ण प्रक्रिया स्वेच्छेने असेल आणि कोणत्याही मतदाराला जबरदस्तीने आधार लिंक करावे लागणार नाही.  

  • 1950 च्या जनप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 23(4), 23(5) आणि 23(6) नुसार मतदारांना आधार क्रमांक जमा करण्याचा पर्याय असेल.  
  • आधार क्रमांक न दिल्यास, मतदार यादीतून नाव हटवले जाणार नाही.  

फॉर्म 6B मध्ये बदल

Voter ID आणि आधार लिंकिंग प्रक्रियेसाठी फॉर्म 6B मध्ये बदल करण्यात येणार आहेत.  

  • आधी फॉर्म 6B मध्ये आधार क्रमांक देणे अनिवार्य होते.  
  • आता आधार क्रमांक देणे स्वेच्छेचे असल्याचे स्पष्ट करण्यात येणार आहे. 
  • जर एखाद्या मतदाराकडे आधार क्रमांक नसेल, तर त्याला त्याचे स्पष्ट कारण द्यावे लागेल.  

Voter ID आणि आधार लिंकिंगबाबतची अधिकृत घोषणा आणि प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाणार आहे.

.🔴 हेही वाचा 👉 Best Saving Scheme For Ladies : महिलांसाठी सर्वोत्तम बचत योजना कोणती? सुकन्या समृद्धि योजना की महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट.

Share This Article