Maharashtra Budget 2025 Update : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरूच राहणार असली, तरी 2100 रुपयांची वाढ नाकारण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात मोठा धक्का – 2100 रुपयांची वाढ नाही!
सोमवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा ₹7.20 लाख कोटींचा अर्थसंकल्प 2025-26 (Maharashtra Budget 2025-26) सादर केला. यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी ₹36,000 कोटींच्या तरतूदीची घोषणा करण्यात आली आहे, मात्र 1500 रुपयांच्या हफ्त्याची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही.
“महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यात ₹2100 ची घोषणा झाली होती, पण राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे सध्या ती वाढ करता येणार नाही.” – अजित पवार
🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? मोठी अपडेट समोर!.
विरोधकांचा सरकारला सवाल!
अर्थसंकल्प सादर होण्याआधीच विधानभवनाच्या वर्तुळात चर्चा होती की, लाडकी बहीण योजनेचे भवितव्य काय? महिलांना 2100 मिळणार की नाही? विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारला थेट आव्हान दिले होते. मात्र, अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर महिलांना अपेक्षित असलेली वाढ नाकारण्यात आली.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना सुरू करता येतील!.
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा:
- राज्याचा महसुली तुटीचा आकडा: ₹45,892 कोटी
- राजकोषीय तूट: ₹1,36,234 कोटी
- कृषी क्षेत्रासाठी AI तंत्रज्ञान: ₹500 कोटींची तरतूद
- सिंचन प्रकल्प व जलसंधारण: ₹88,574 कोटींची नदीजोड प्रकल्पाची घोषणा
- उद्योग धोरण: मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राला ग्रोथ हब म्हणून विकसित करणार
- नवीन विमानतळ: पालघर जिल्ह्यात वधवन येथे प्रस्तावित
वाहतूक क्षेत्रासाठीचे निर्णय!
- इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर (₹30 लाखांवरील गाड्यांसाठी)
- CNG आणि LPG वाहनांवर 1% करवाढ
- बांधकाम क्षेत्रातील वाहनांवर 7% कर लागू
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हफ्ता वाढीचे आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी ‘महायुती सरकारने राज्यातील महिलांची फसवणूक केली’ असल्याचा आरोप केला आहे.